… आणि ट्रॅफिकमुळे पकडला गेला किडनॅपर

आपण सर्वचजण ट्रॅफिकमध्ये दररोज अडकतो. ऑफिसला पोहचण्यासाठी असो अथवा इतर कोठे जाण्यासाठी ट्रॅफिकमुळे अनेकदा उशीर होतो. मात्र दिल्लीत ट्रॅफिकने किडनॅप करून घेऊन चाललेल्या एका मुलाला वाचवले आहे. ट्रॅफिकमुळे किडनॅपरना पकडण्यास पोलिसांना मदत झाली.

पोलिसांना फोन आला की, जनकपूरी येथील आकाश इंस्टिट्यूटजवळ हिमाचल प्रदेशचा नंबर असलेल्या कारमध्ये त्याच्या भावाला किडनॅपर किडनॅप करून घेऊ जात आहेत. कारच्या काचेवर हायलँडर लिहिले असल्याचे देखील सांगितले.

या फोननंतर पोलिसांनी 7 मिनिटामध्ये तेथे पोहचत एका आरोपीला अटक केले. किडनॅपर गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ट्रॅफिक जॅममुळे अडकले. पोलिसांची गाडी जवळ येताच किडनॅपर गाडीतून उतरून पळून जाऊ लागले. तीन आरोपी फरार झाले असून, त्यातील एकाला पोलिसांनी पकडले. फरार झालेल्या तिन्ही आरोपींचा पोलिस शोध घेण्यात येत आहे.

किडनॅप करण्यात आलेल्या मुलाचे नाव रिजवल कुमार (21) असून, तो हिमाचल प्रदेशचा आहे. ट्रॅफिक जॅममुळे या तरूणाची सुटका झाली.

Leave a Comment