रॉयल एनफिल्डची सर्वात पॉवरफूल बाईक लवकरच होणार भारतात लाँच

रॉयल एनफिल्डने आपली सर्वात पॉवरफूल बाईक बॉब्बर 838 ला EICMA मोटर शो 2018 मध्ये सादर केले होते. मात्र त्यावेळी कंपनीने या बाईकबद्दल जास्त माहिती दिली नव्हती. आता सांगण्यात येत आहे की, कंपनी ही पॉवरफूल बाईक लवकरच भारतीय बाजारात लाँच करणार आहे.

(Source)

या बाईकच्या इंजिनबद्दल सांगायचे तर यामध्ये लिक्विड कूल्ड, फ्यूल इंजेक्टेड 834cc चे जबरदस्त इंजिन आहे. जे 90-100 Hp पॉवर देते. याशिवाय यात 6 स्पीड गेअर बॉक्स देखील मिळेल. रिपोर्टनुसार, ही बाईक पोलारिस इंडस्ट्रीज आणि Eicher मोटर्सने मिळून तयार केली आहे. एवढ्या मोठ्या इंजिनमध्ये येणारी रॉयल एनफिल्डची ही पहिली बाईक आहे.

(Source)

याशिवाय बॉब्बर 838 मध्ये ट्विन एग्जॉस्ट , फ्रंट व्हीलमध्ये ट्विन डिस्क ब्रेक्स, फ्लॅट हँडलबार आणि मोठे व्हीलबेस देण्यात आले आहे. या बाईकच्या फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक फॉर्क आणि रिअर व्हीलमध्ये मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले आहे. यामध्ये सिंगल सीट देण्यात आली असून, दुसऱ्या सीटसाठी यामध्ये पर्याय मिळण्याची शक्यता आहे.

(Source)

या बाईकचे डिझाईन एकदम शानदार आहे. यामध्ये फुल एलइडी हेडलँप सोबत डीएलआर देण्यात आले आहे. कंपनी पुढील वर्षी होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये ही बाईक लाँच करण्याची शक्यता आहे. किंमतीबद्दल सांगायचे तर या बाईकची किंमत 6 लाखरूपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment