असदुद्दीन ओवेसी यांचा हास्यास्पद दावा; म्हणे एका दिवसात मी केले १५ बॉटल रक्तदान


नवी दिल्ली – एका दिवसात १५ बॉटल रक्तदान केल्याच्या वक्तव्यावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी हे जोरदार ट्रोल झाले आहेत. सोशल मिडियावर त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ओवेसी यांनी महाराष्ट्रातील एका प्रचार सभेत मी एका दिवसात १५ बॉटल रक्तदान केले आहे. फक्त शिबिरांमध्ये नाही तर हैदराबादमधील उस्मानिया सामान्य रुग्णालयात जावून व्यक्तिगत रक्तदान देखील केल्याचे सांगितले. नेटकऱ्यांनी त्यावरून त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.

४ हजार ५०० पासून ते ५ हजार ७०० मि.ली.ची रक्त मात्रा एक व्यक्तीमध्ये असते. एका युनिटमध्ये (बॉटल) रक्त असण्याची क्षमता ५२५ मि.ली. असते. १५ यूनीट रक्त म्हणजे ७ हजार ८७५ मि.ली. असे प्रमाण होते. ओवीसी यांच्या म्हण्यानुसार जर त्यांनी एका दिवसामध्ये १५ युनीट रक्त दिले आहे. तर वैद्यकीय विज्ञान तर विसरूनच जा, देव सुद्ध या गोष्टीचे समर्थन नाही करू शकत, असे एका नेटकऱ्याने टि्वटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment