डीआरडीओने तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबत केले 30 करार


पणजी – 16 भारतीय कंपन्यांबरोबर तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने 30 करार केले आहेत. 3 स्टार्टअपचा देखील यामध्ये समावेश आहे. 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान गोव्यात आयोजित ‘व्हायब्रंट गोवा’ जागतिक प्रदर्शन आणि शिखर परिषदे दरम्यान हे करार करण्यात आले.

सशस्त्र दलांसाठी डीआरडीओ ही संस्था तंत्रज्ञान विकसित करते. संरक्षण उद्योगाकडे हे तंत्रज्ञान हस्तांतरीत केले जाते. भारतीय सशस्त्र दलांना संरक्षण क्षेत्रातील या उद्योगांकडून ‘रेडी टू इट जेवण’ आणि इतर जीवनावश्यक सुविधा पुरवल्या जातात. भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांना ही उत्पादने लहरी हवामानात तग धरण्यासाठी उपयोगी पडतात. या उत्पादनांचे पोषण मूल्य उच्च दर्जाचे असते. शिवाय ते खराब न होता अनेक महिने टिकते.

Leave a Comment