Viral : वाहतूक पोलिसांच्या भितीने आता कुत्रे ही घालू लागले आहेत हेल्मेट

देशात मोटार वाहन कायदा चालू झाल्यापासून वाहनचालकांमध्ये दंडाच्या रक्कमेबद्दल भिती आहे. दंडाची रक्कम वाढल्यापासून वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करत आहेत. हेल्मेटच्या विक्रीमध्ये देखील वाढ झाल्याचे दिसून आलेले आहे. वाहतुकीच्या दंडाबद्दल लोकांमध्ये एवढी भिती आहे की, आता कुत्रे देखील गाडीवर हेल्मेट घालून प्रवास करत आहे. हो, हे खरे आहे. एका कुत्र्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनेक ट्विटर युजर्सनी या हेल्मेट घातलेल्या कुत्र्याचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दिसत आहे की, कुत्रा दुचाकीवर मागच्या सीटवर बसला असून, त्याने हेल्मेट परिधान केले आहे.

अनेकांनी हे वाहतूक पोलिसांची भिती आहे असे म्हटले तर काहींनी पोलिसांनी वाहतूक नियमांच्या कॅम्पेनसाठी या कुत्र्याचीच निवड करावी असे म्हटले.

Leave a Comment