… म्हणून त्यांनी चक्क ‘बस’लाच बनवले क्लास रूम

अरूणाचल प्रदेशमधील लोहित जिल्ह्यातील शाळा भवन येथे जागा कमी पडत असल्याने यावर प्रशासनाने हटके पर्याय शोधला आहे. याठिकाणी जुनी झालेली आणि अशीच पडून असलेल्या बसला क्लास रूमचे स्वरूप आले आहे. या बसमध्ये टेबल, खुर्ची आणि ब्लॅकबोर्ड लावण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शाळेत जागा कमी पडत असल्याने असे करण्यात आले आहे. अनेकदा मोठ्या आणि छोट्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसावे लागत असे. शिक्षकांना देखील शिकवण्यास अडचण होत असे. यामुळे विद्यार्थी देखील शाळा सोडून जात आहेत.

थोवांग गावातील विद्यार्थांना बसमधील शाळा खूपच आवडली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह आहे. विद्यार्थी आता आधीच्या तुलनेत अधिक उत्साहाने आणि आनंदाने शाळेत येत आहेत.

लोहितचे उपायुक्त प्रिंस धवन यांनी सांगितले की, शाळेत जागा कमी पडत आहे, त्यावर सध्या कोणतेही समाधानकारक पर्याय सापडलेला नाही. मात्र विद्यार्थ्यांसाठी हे मजेशीर आहे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी ही एक चांगली पध्दत आहे.

Leave a Comment