या रिक्षा चालकाला नव्हता थांगपत्ता, 256 चलान होती त्याच्या नावे

वाहतुकीच्या नवीन नियमांनंतर वाहन चालक मोठ्या प्रमाणात दंड भरत आहेत. मात्र गुजरातच्या वाहतूक पोलिसांनी एका रिक्षा चालकाला जुन्या नियमांच्या आधारावर 76 हजार रूपयांचा ई-मेमो सोपवला आहे. मागील 5 वर्षांमध्ये वाहुतकीचे नियम मोडल्याचा हा दंड आहे.

शेख मुशर्रफ शेख रशीद 2011 पासून रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत आहेत. त्यांना वाहतुक पोलिसांनी 256 ई-मेमो दिले असून, या सर्वांच्या दंडाची रक्कम 76 हजार रूपये आहे. एवढ्या मोठ्या रक्कमेचा दंड भरावा लागणार असल्यामुळे शेख रशीद यांनी आपल्या पत्नी व मुलांसह वाहतुक पोलिस डीसीपी प्रशांत सुंबे यांची भेट घेतली.मात्र त्यांची निराशा झाली.

सुरत शहराच्या मुख्य रस्त्यांवर पोलिसांकडून सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यावर या कॅमेऱ्यांपासून वाचणे अवघड आहे.

या कॅमेऱ्यांना ऑपरेट करण्यासाठी एक कंट्रोल रूमच बनवण्यात आले आहे. शेख रशीद हे देखील याच कॅमेऱ्यामध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना कैद झाले. 2014 ते 2019 या पाच वर्षात त्यांनी 256 वेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. आता हा दंड भरण्याशिवाय त्यांच्याकडे काहीही पर्याय नाही.

 

Leave a Comment