घराच्या छतावर विमान बनवणाऱ्याला अखेर मिळाली उड्डाणाची परवानगी

मुंबईमधील गोरेगाव येथे राहणारे अमोल यादव हे कमर्शियल पायलट आहेत. 19 वर्षांच्या संघर्षानंतर अखेर त्यांनी स्वतः बनवलेल्या सहा सीटांच्या देशी विमानाला नागरी हवाई वाहतूक संचालकांकडून (डीजीसीए) उड्डाण घेण्याची परवानगी मिळाली आहे. रविवारी अमोल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटी घेतली. मोदींनी देखील अमोल यांच्या प्रयत्नांचे कौतूक केले. परवानगी मिळाल्यानंतर अमोल यांनी केवळ माझेच नाही तर माझ्या संपुर्ण कुटुंबाचे स्वप्न पुर्ण झाले असल्याचे म्हटले आहे.

अमोल यादव यांनी आता 19 सीटच्या विमानाची निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी सांगितले की, 90 च्या दशकात 19 व्या वर्षी अमेरिकेत पायलटची ट्रेनिंग घेतली. भारतात परतल्यावर एअरक्राफ्ट खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतात एअरक्राफ्ट बनवले जात नाहीत. तेव्हा त्यांनी स्वतः एअरक्राफ्ट बनवण्याचा निर्णय घेतला. जवळपास 19 वर्षांपुर्वी त्यांनी घराच्या छतावरच विमान बनवण्यास सुरूवात केले. त्यांनी बनवलेले हे तिसरे विमान आहे.

2003 मध्ये दोन एअरक्राफ्ट बनवले, मात्र दोन्ही अयशस्वी ठरले. त्यानंतर 6 वर्ष मेहनत घेऊन 2009 मध्ये नवीन विमान बनवले. यासाठी पिस्टन इंजिन आणि अन्य पार्ट्स परदेशातून मागवण्यात आले. मागील 19 वर्षात विमान बनवण्यासाठी 5 कोटी रूपये खर्च झाले आहेत.

विमान बनवण्यासाठी केवळ स्वतःचा पगारच नाही तर आईचे दागिने देखील विकले. मोठ्या भावाने घर देखील तारण ठेवले. मात्र आता डीजीसीएकडून उड्डाणाची परवानगी मिळाली आहे.

जेट एअरवेजमध्ये दिवसा नोकरी करून रात्री घराच्या छतावर विमान बनवणाऱ्या अमोल यांच्या यशानंतर महाराष्ट्र सरकारने 35 हजार कोटींचा करार केला आहे. याशिवाय पालघरमध्ये जागा आणि एअरस्ट्रिप देखील दिले आहे. डिसेंबरमध्ये डीजीसीए त्यांच्या या विमानाची चाचणी घेईल. जे विमान परदेशी कंपनी एक ते दीड हजार कोटी रूपयांमध्ये बनवते. ते विमान अमोल 250 कोटींमध्ये बनवणार आहेत.

Leave a Comment