विधानसभा निवडणुकीवर 30 हजार कोटींचा सट्टा


मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान सुरु असून विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जीवापाड मेहनत घेतली आहे. पण दुसरीकडे सट्टा बाजारही निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज झाला असून जवळपास 30 हजार कोटींचा सट्टा महाराष्ट्र आणि हरियाणा मध्ये होणाऱ्या निवडणुकीवर लागला आहे.

या एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार 30 हजार कोटींचा सट्टा विधानसभा निवडणुकीवर लागला असल्याची माहिती आहे. सट्टेबाजार महाराष्ट्र, हरियाणा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार भाजप आणि शिवसेनेला 288 पैकी एकूण 210-215 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ पास 55 ते 60 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी मोबाईल अॅप आणि हायटेक पद्धतीने सट्टा सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी महाभारत सुरू झाले आहे. शह आणि मात हा खेळ सुरू झाला आहे प्रत्येक पक्ष आपला मोहरा निश्चित करत आहे. पण त्याचबरोबर सट्टेबाजार प्रत्येक निवडणुकीत कोट्यवधीमध्ये चालतो. म्हणूनच हा बाजार यंदाही सजला आहे. सट्टेबाज मुंबईसोबतच देशभर आणि परदेशात बरेच ठिकाणी सक्रीय झाले आहेत.