फलंदाजीनंतर गोलंदाजीतही उमेश यादवची कमाल, अनोख्या विक्रमाला गवसणी


नवी दिल्ली – भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका जोरदार कामगिरी केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडलेल्या उमेशने गेल्या दोन सामन्यात टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. घरच्या मैदानावर खेळताना उमेश सलग पाच डावात तीन किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान रांची येथे खेळल्या जाणार्‍या मालिकेच्या तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात षटकारांची आतषबाजी केल्यानंतर उमेश यादवने गोलंदाजीतही आपली चमक दाखवली आहे. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव केवळ 162 धावांवर आटोपण्यात उमेशने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने पहिल्या डावात 9 षटकांत 40 धावा देऊन 3 बळी घेतले. या मालिकेत भारताने दक्षिण आफ्रिकेनंतर सलग दुसऱ्यांदा फॉलोऑन दिला आहे.

घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या अखेरच्या पाच डावांमध्ये उमेश यादवने शानदार गोलंदाजी केली. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारताच्या विजयात तो स्टार म्हणून उदयास आला. हैदराबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध उमेशने पहिल्या डावात 6 गडी बाद केले तर दुसऱ्या डावात 4 बळी घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याने पुण्यात 3-3 आणि रांचीच्या पहिल्या डावात तीन विकेट्स घेतल्या.

वेस्ट इंडिजविरुद्ध उमेशने 88 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या आणि नंतर दुसऱ्या डावात 45 धावा देऊन 4 बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने पहिल्या डावात 37 धावांत 3 गडी बाद केले आणि दुसर्‍या डावात 22 विकेट्स घेत 3 धावा केल्या. आता रांचीमध्ये त्याने पहिल्या डावात 40 धावा देऊन 3 विकेट घेण्याची कमाल केली आहे.

Leave a Comment