उन्हाने होरपळलेल्या कतार मध्ये सार्वजनिक जागी एसी, निळे रोड


कतारची राजधानी दोहा सध्या उन्हाच्या झळांनी हैराण असून शहरातील नागरिक असह्य उन्हाने होरपळून निघत आहेत. येथील तापमानाचा पारा ४६ ते ५० डिग्रीच्या दरम्यान गेल्याने उकाड्यापासून बचाव व्हावा म्हणून शहरात सार्वजनिक जागी एअर् कंडीशनर्स, मोठमोठे कुलर्स लावले गेले आहेत. मार्केट, क्रीडांगणे, अश्या अनेक ठिकाणी नागरिकांना उन्हापासून संरक्षण देण्यासाठी आणि गारवा मिळाला म्हणून ही व्यवस्था केली गेली आहे.


रस्ते तापून हवा अधिक गरम होते आहे त्याला प्रतिबंध करण्यासाठी रस्त्यांवर जाड निळी चादर घातली गेली असून त्यात हिट रीफ्लेक्टींग पिग्मेंट मिसळली गेली आहेत. काळ्या रस्त्याच्या तुलनेत हे निळे रस्ते कमी उष्णता शोषतात. डांबरी रस्त्यांचे तापमान प्रत्यक्ष तापमानापेक्षा २० डिग्री अधिक असते असे सांगितले जाते. शहरात थंड हवा खेळती राहावी म्हणून बहुतेक गल्ल्या आणि रस्ते उत्तरेकडे तोंड करून बनविले गेले आहेत. फारस खाडी प्रायद्विपावर वसलेले दोहा नेहमीच उन्हाळ्यात असह्य तापते. खाडीतील पाण्याच्या वरचे तापमान ३२ डिग्री पर्यंत असते त्यामुळे शहराचे तापमान ४६ डिग्रीच्या वर जाते असे सांगितले जाते.

Leave a Comment