कमलनाथ यांच्या भाच्याने एक रात्रीतून नाइट क्लबमध्ये उडवले 7.8 कोटी

अंमलबजावणी संचानालयाने (ईडी) मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी, त्याचे सहकारी आणि वडिलांची कंपनी बेअर इंडिया लिमिडेट विरोधात 8 हजार कोटींच्या बँक लोन मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, रतुल पुरीने अमेरिकेतील एका नाइट क्लबमध्ये एका रात्रीत 11 लाख डॉलर म्हणजेच 7.8 कोटी रूपये उडवले आहेत.

ईडीच्या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे की, भारत आणि परदेशात लग्झरी हॉटेल्समध्ये राहण्याचे अनेक व्यवहार झाले आहेत. प्रोवोकेटर नावाच्या एका नाइट क्लबमध्ये एकाच रात्रीत 7.8 कोटी रूपये पुरीने उडवले आहेत.

नोव्हेंबर 2011 ते ऑक्टोंबर 2016 दरम्यान पुरीने स्वतःवर 4.5 मिलियन डॉलर खर्च केले आहेत. आरोपपत्रात रतुल पुरीने जवळपास 8 हजार कोटी रूपयांची मनी लाँड्रिंग केले असल्याचे म्हटले आहे. बेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने बँकेकडून कर्ज घेत सब्सिडियरी कंपनीमध्ये ट्रांसफर केले.

ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात 110 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात देखील रतुल पुरी आरोपी आहे.

 

Leave a Comment