या ठिकाणी सापडल्या 200 वर्ष जून्या ब्रिटिशकालीन तोफा

नागपूर महापालिकेला कस्तूरचंद पार्क (केपी ग्राउंड) येथे खोदकाम करताना ब्रिटिशकालीन 4 तोफा सापडल्या आहेत. इतिहासकारांनुसार, या तोफा 1813 ते 1817 या काळातील असण्याची शक्यता आहे. या तोफा सैन्याने आपल्या ताब्यात घेतल्या असून, या तोफा 9 फूट 6 इंच लांब आहेत. ग्राउंडच्या एका स्मारकाजवळ आधीच अशा चार तोफा आहेत. इतिहासकार भारा अंधारे यांच्यानुसार, 1817 ते 1818 या काळात मराठ्यांचे इंग्रज सैन्याबरोबर युध्द झाले होते. तेव्हा इंग्रजांनी युध्दात तोफांचा वापर केला होता.

युध्दानंतर तोफा या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. महानगरपालिका पार्कच्या ग्राउंडमध्ये पाणी जमा होऊ नये, यासाठी ड्रॅगन लाइन टाकण्यासाठी जेसीबीने ग्राउंडमध्ये खोदकाम करण्यास सुरूवात केली. याचवेळी या तोफा येथे सापडल्या.

राजे मुधोजी भोसले देखील या तोफा पाहण्यासाठी केपी ग्राउंडवर पोहचले. इंग्रजांनी 1882 मध्ये ही जागा व्यावसायिक-समाजसेवक कस्तूरचंद डागा यांना दिली होती. वर्ष 1908 मध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांसाठी येथे पॅवेलियन बनवण्यात आले होते.

Leave a Comment