नायजेरिया / इग्बो-ओरामध्ये सुरु झाला जुळ्यांचा उत्सव


इग्बो-ओरा – नायजेरियातील इग्बो-ओरा शहराला जुळ्या मुलांची राजधानी असे म्हटले जाते. येथे जुळ्या मुलांचा जन्म उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. या महोत्सवाला शुक्रवारी प्रारंभ झाला आहे. त्यात सामील होण्यासाठी जगभरातून लोक येत आहेत. या उत्सवात लहान मुलांपासून वडीलधाऱ्यांपर्यंत जुळे पाहायला मिळतात. असा दावा आहे की इग्बो-ओरामध्ये जगातील सर्वाधिक जुळी मुले आहेत. नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिक्सच्या मते, अमेरिकेतील प्रत्येक एक हजार जन्मांपैकी 33 जुळ्या मुलांचा जन्म होतो. त्याच वेळी, इग्बो-ओरामध्ये प्रति हजार जन्मासाठी सरासरी 50 जुळी मुले जन्माला येतात.

पुर्व वसाहती काळात जुळ्या मुलांचा जन्म बहुधा वाईट मानला जात असे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे, पण आज जुळ्या मुलांना आशीर्वाद म्हणून पाहिले जाते. शास्त्रज्ञ म्हणतात इग्बो-ओरामध्ये हे का घडत आहे याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

स्थानिकांच्या मते महिलांच्या खानपानामुळे येथे जुळी मुले जन्माला येतात. स्थानिक नेते सॅम्युएल एड्यूवी आडेले यांनी सांगितले की आमचे लोक याम, अमालाबरोबर भेंडीची पाने किंवा इल्सा खातात. यामध्ये गोनाडोट्रोपिन नावाचा एक रासायनिक पदार्थ असतो, ज्यामुळे मादीमध्ये बरीच अंडी तयार होतात. तथापि, याबाबत फर्टिलिटी तज्ञ संभ्रमात आहेत. ते म्हणतात की ते अनुवांशिक कारणामुळे आहे.

Leave a Comment