‘नकलाकार चीन’, या लग्झरी गाड्यांची हुबेहुब केली आहे कॉपी

काही दिवसांपुर्वीच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग भारतात आले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील होंगकी एल-5 कारची जोरदार चर्चा झाली. मात्र चीनची ही खास कार टोयोटाच्या सेंचूरी लिमोची हुबेहुब नक्कल आहे. ही एकमेव कार नाही, ज्याची चीनने नक्कल केली असेल, अशा अनेक कार्स आहेत. या कारबद्दल जाणून घेऊया.

(Source)

2009 मध्ये चीनच्या जीली जीईने क्लासिक कार शांघाई मोटार शोमध्ये सादर केली होती. या कारचा लूक हा रॉल्स रॉयलच्या फँटमशी अगदी मिळता जूळता आहे. या कारची किंमत 44 हजार डॉलर ठेवण्यात आली होती. तर त्यावेळी फॅटमची किंमत साडेतीन लाख डॉलर होती.

(Source)

चीनची बीवायडी एस8 ही देशातील पहिली हार्डटॉप कन्वर्टिबल कार आहे. या कारचा पुढील भाग मर्सिडीज बेंज सीएलके शी मिळता जुळता आहे. तर मागील भाग रेनो मेगाने सीसीची कॉपी आहे. कंपनीने या कारची किंमत 22 हजार डॉलर ठेवली होती. नंतर या कारचे नाव बदलून एफ8 करण्यात आले.

(Source)

चीनची ही कार मर्सिडीज जीएलए प्रमाणे दिसते. याचा आकार हेडलाईट्स, आणि रेडिएटर ग्रिल जीएलएशी मिळते-जुळते आहे. चीनमधील या कारचे नाव के-वन आहे. ही एक इलेक्ट्रिक कार असून, याची मोटार 128 हॉर्सपॉवर देते.

(Source)

चीनने मॅकान पोर्शची नक्कल करून सर्वांनाच हैराण केले आहे. मॅकानचे चीनी व्हर्जन झोटये एसआर8 आहे. बाहेरून दोन्ही कारच इंटेरियर देखील एकसारखेच आहे. झोटये एसआर9 ची किंमत 16 हजार डॉलर ते 24 हजार डॉलरपर्यंत आहे.

(Source)

भारतामध्ये रेंज रोव्हर इवोक लोकप्रिय आहे. चीनने 2015 मध्ये या कारचे व्हर्जन लाँच केले आहे. या चीनी व्हर्जनचे नाव लँविंड एक्स7 आहे. दोन्ही कारमध्ये 2.0 लीटरचे टर्बोइंजिन आहे. इवोकचे इंजिन 237 एचपी पॉवर देते तर लँडविंडचे व्हर्जन 190 एचपीचे पॉवर देते. लँडविंडची किंमत ही 19,600 डॉलरपासून सुरू आहे. तर इवोकची किंमत 86300 डॉलरपर्यंत आहे.

(Source)

चीनने हमरचे देखील व्हर्जन तयार केले आहे. हमरचे चीनी व्हर्जन BAIC Yongshi, Shenyang SFQ2040, Xiao Long XL2060L आणि Dongfeng Hanma यांच्याशी मिळते जुळते आहे. हमरचे सर्वात मिळती-जुळती कार डोंगफेंग हनमा आहे. ही अमेरिकेची मिलिट्री व्हर्जन हमवीची कॉपी आहे. या गाडीत 6.5 लीटर व्ही8 इंजिन आहे.

(Source)

लिफान ग्रुपने बीएमडब्ल्यूची छोटी हॅचबॅग कार मिनी कूपरचे चीनी व्हर्जन बनवले होते. त्यानंतर कंपनीने याचे नवीन व्हर्जन लिफान-330 लाँच केले. नवीन व्हर्जनमध्ये डॅशबोर्ड, स्पिडोमीटर आणि इंटेरियर कॉपी करण्यात आले होते. कंपनीने लिफानचे स्टँडर्ड, लग्झरी आणि फ्लॅगशिप तीन व्हेरिएंट लाँच केले आहेत. तिन्हीमध्ये 1.3 लीटरचे इंजिन आहे.

(Source)

चीनने स्पोर्ट्स कार मॅकलॉरेन 570 जीटीची देखील कॉपी केली आहे. या चीनी व्हर्जनचे नाव केडीसी रेगोला आहे. केडीसी ही इलेक्ट्रिक कार आहे.

(Source)

Zotye ने झे700 नावाने ऑडी एस6एलचे चीनी व्हर्जन बनवले आहे. झेड700 ची किंमत 16 हजार डॉलर ते 25 हजार डॉलर एवढी आहे. या कारमध्ये 1.8 लीटर आणि 2.0 लीटर फोर सिलेंडर टर्बोचार्ज्ड इंजिन आहे.

(Source)

चीनने शुझहोऊ ईगल कॅरी ही कार पोर्श कॅमेन आणि फरारी स्पोर्टस कारचे मिश्रण आहे. मात्र ईगर कॅरी ही इलेक्ट्रिक कार आहे. याची रेंज 257 किमी आहे. तर कार 4.8 सेंकदामध्ये ताशी 100 किमीचा वेग पकडते.

(Source)

टेस्ला मॉडेल एसचे देखील चीनी व्हर्जन तयार आहे. चीनी कंपनी एक्सियाने रेंजर एक्स नावाने ही इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. ही कार 5.6 सेंकदात ताशी 100 किमीचा वेग पकडतात. या कारची किंमत 20,497 पाउंड आहे तर टेस्ला एक्सची किंमत 45,800 पाउंड आहे.

Leave a Comment