तळीरामांसाठी उच्च न्यायालयाकडून खुशखबर


मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने विधानसभा निवडणुकीची मतमोजणी संपल्यावर सायंकाळी शहरात सहानंतर मद्य विक्रीस विक्रेत्यांना परवानगी दिली आहे. राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १९ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजल्यापासून ते २१ ऑक्टोबरपर्यंत आणि निकालाच्या दिवशी दारु विक्री बंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र वाइन मर्चंट असोशिएशनने त्याविरोधात ४ ऑक्टोबर रोजी आदेशाविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने मद्यविक्रेत्यांना निकालाच्या दिवशी संध्याकाळी ६ नंतर मद्य विक्रीची परवानगी दिली आहे. मात्र १९ ते २१ ऑक्टोबरपर्यंतच्या मद्यविक्रीबाबात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्यात उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

Leave a Comment