जपानच्या नवीन सम्राटांचा २२ ऑक्टोबरला राज्याभिषेक


जपानचे नवे सम्राट नारुहितो यांचा राज्याभिषेक सोहळा २२ ऑक्टोबर पासून सुरु होत असून या समारंभासाठी जगभरातून ११७ देशांचे प्रतिष्ठित पाहुणे हजर राहणार असल्याचे समजते. या भव्य कार्यक्रमात एकूण २ हजार लोक सामील होणार आहेत. इम्पिरीअल पॅलेसमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी १ वाजता कार्यक्रमाची सुरवात होणार आहे. सम्राट पारंपारिक रोब व हेड रेस्ट अश्या वेशात राज्याभिषेकासाठी येतील असे समजते. सम्राटाच्या सन्मानार्थ प्रचंड प्रमाणात दागिने आणि तलवारी प्रदर्शित केल्या जाणार आहेत. पंतप्रधान शिंजो आबे यांच्या भाषणानंतर राज्याभिषेक सोहळा सुरु होणार आहे.

राज्याभिषेक सोहळा आणि त्यानिमित्ताने वर्षभर होणारे विविध कार्यक्रम यासाठी जपान सरकारने १४८ दशलक्ष डॉलर्स खर्च करण्याची योजना आखलेली आहे. मिडिया रिपोर्ट नुसार ब्रिटीश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स, अमेरिकेचे वाहतूक मंत्री एलेन चाव, उपराष्ट्रपती वांग किशन, द. कोरियाचे पंतप्रधान ली नाकसोन, युक्रेनचे राष्ट्रपती वलोडीमीर जेलेन्स्की, म्यानमारच्या आंग स्यू की, सौदीचे राजकुमार प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, तुर्कीचे इर्दोगेन यांचा उपस्थितांमध्ये समावेश आहे.

या दिवशी कैदेतील ५ लाख ५० हजार कैद्यांची सुटका केली जाणार आहे. छोट्या अपराधाखाली शिक्षा भोगत असलेले अथवा ज्यांनी दंड भरलाय अश्या कैद्यांना यावेळी मुक्त केले जाणार आहे. जपानमध्ये ज्यांना शिक्षा सुनावली गेली आहे असे गुन्हेगार किमान ५ वर्षे डॉक्टर किंवा नर्स म्हणून काम करू शकत नाहीत.

Leave a Comment