आसाममध्ये बस थांब्यालाच बनवले ग्रंथालय


आता बस थांब्यावर उभे राहून बसची वात पाहताना तुम्हाला कंटाळा येणार नाही. कारण येथील एका बस थांब्याचे रूपांतर ग्रंथालयात करण्यात आले आहे. येथे थांबणारी लोकं येथे पुस्तक वाचत बसची वात पाहतात.

हा अनोख प्रयोग ब्रह्मपुत्र साहित्य महोत्सवात करण्यात आला. या राज्यात पहिल्यांदाच साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे येणाऱ्या लोकांची संख्या पाहता हे महोत्सव यशस्वी होत असल्याचे म्हटले जात आहे. एका जाहिरात कंपनीचे संचालक अनुप खन्ना यांनी विशेष ग्रंथालयाची स्थापना केली आहे. येथे २००-२५० कपाटे पुस्तकांनी भरलेली आहेत.

Leave a Comment