येथे सुरू झाले जगातील सर्वात मोठे फिटनेस चँलेज

जगातील सर्वात मोठा सिटीवाइड (संपुर्ण शहर) इव्हेंट ‘दुबई फिटनेस चँलेंज’ (डीएफसी 2019) आज पासून सुरू झाला आहे. यामध्ये पुढील एक महिन्यात शहर आणि आजुबाजूच्या परिसरातील लोक वेगवेगळ्या ठिकाणी 30 मिनिटे व्यायाम करतील. दुबईला जगातील सर्वात फिट आणि सक्रिय शहर बनवण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात असून, हे याचे तिसरे वर्ष आहे. यामध्ये 10 लाखांपेक्षा अधिक लोक भाग घेण्याची शक्यता आहे.

2017 मध्ये या इव्हेंटची सुरूवात करण्यात आली होती. लोकांनी फिटनेसप्रती जागृक व्हावे यासाठी याचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा या इव्हेंटसाठी खास कॅलेंडर तयार करण्यात आले आहे.

(Source)

प्रशासनाने पर्यटकांना देखील यामध्ये भाग घेण्यास सांगितले आहे. यामध्ये सहभागी होणारे लोक वर्कआउटसोबतच समुद्र किनाऱ्यावरील खेळ, योगा, मार्शल आर्ट, बॉक्सिंगमध्ये देखील भाग घेऊ शकतील.

चँलेजमध्ये भाग घेण्यासाठी डीएफसी अॅप डाउनलोड करावे लागेल. निश्चित करण्यात आलेल्या ठिकामी जाऊन क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर कोणता वर्कआउट करायचा हे मोबाईलवरच सांगितले जाईल. 2018 मध्ये या चँलेजमध्ये 10 लाख लोकांनी भाग घेतला होता. तर पहिल्यावर्षी 7.5 लाख लोकांनी भाग घेतला होता.

(Source)

इव्हेंसाठी एक नकाशा देखील बनवण्यात आला आहे. ज्यामध्ये वर्कआउट कोणत्या ठिकाणी करायचा याची माहिती आहे. शहरातील 30 ठिकाण व्यायाम करण्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत. मॉल आणि बीचवर देखील लोक व्यायाम करू शकतात. याशिवाय 40 वेगवेगळे इव्हेंट्स आणि 5 हजार मोफत क्लास देखील मिळेल.

Leave a Comment