गाड्यांवर लावावी लागेल ही खास टेप, नाहीतर होईल दंड

सरकार आता सर्व वाहनांवर रेट्रो रिफ्लेक्टिव (चमकणारा) टेप लावणे अनिवार्य करणार आहे. वाहनांच्या पुढे व मागे एक खास प्रकारचा व आकाराचा टेप लावणे गरजेचे आहे. टेप न लावल्यास वाहनचालकांना दंड भरावा लागेल.

रेट्रो रिफ्लेक्टिव टेपचा फायदा –

रात्रीच्या वेळी अनेकदा गाड्या दिसत नाही, अशा वेळेस अपघात होत असतात. वाहनांच्या नंबर प्लेटबरोबर मागे व पुढे एक चमकदार टेप लावला तर गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाश पडल्याने हा टेप चमकेल. यामुळे समोर एखादे वाहन उभे आहे हे वाहनचालकाला लगेच समजेल. त्यामुळे सरकार आता ऑटो-रिक्शा, ई-रिक्शा, ई-कार्ट, तीन चाकी वाहने आणि ट्रॅक्टर यासह सर्वच वाहनांवर हा टेप लावणे अनिवार्य करणार आहे.

वाहनांना मिळणार नाही फिटनेस प्रमाणपत्र –

जर एखाद्या गाडीवर हा टेप नसेल तर त्या वाहनचालकांना दंड भरावा लागेल. याचबरोबर भविष्यात अशा वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देखील दिले जाणार नाही.

नवीन नियम –

नवीन नियमानुसार, ई-रिक्शा, ई-कार्ट, तीन चाकी वाहनांच्या पुढे पांढऱ्या रंगाचा व मागे लाल रंगाचा रिफ्लेक्टिव टेप लावणे गरजेचे आहे. या टेपची रूंदी 20 मिलीमीटर पेक्षा कमी नसावी. वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी टेपचा रंग व आकार वेगळा आहे.

तुम्हीही लावू शकता रिफ्लेक्टिव टेप –

वाहनांमध्ये रिफ्लेटक्टिव टेप लावणे सुरक्षेच्या दृष्टीने देखील आवश्यक आहे. तुम्ही देखील गाडीवर हा टेप लावू शकता. सध्या बाजारात अनेक कंपन्यांचे रिफ्लेक्टिव टेप्स आहेत.

Leave a Comment