कोणतेही पेय प्या आणि त्यासोबत कप देखील करा फस्त


नवी दिल्ली – प्रदुषणाचे प्रमाण सध्याच्या घडीला प्लास्टिकच्या अतिवापरामुळे वाढले आहे. आता सिंगल यूज प्लास्टिकवर केंद्र सरकारने बंदी आणली असून, आता वेगवेगळे उपाय डिस्पोजल प्लेट्स, कप यांचा वापर कमी करण्याकरता केले जात आहेत. पर्यावरणपूरक आणि खाण्यायोग्य अशा कप वापरण्याचा उपक्रम हैदराबाद येथे सुरू करण्यात आला आहे.

खाण्यायोग्य असलेले कप हैदराबाद येथे लाँच करण्यात आले आहे. शीत आणि गरम पेय या कपातून घेता येणार आहेच पण, त्याबरोबरच हा कप खाण्यायोग्य असल्याने चहा, कॉफी नंतर कप खाताही येणार आहे. स्वच्छता अभियानाबाबत पंतप्रधान मोदी हे जनजागृती करतच राबवत आहेत. सध्या सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर देशभर बंदी आणण्यात आली आहे. प्लास्टिक पर्यावरणाला घातक असून त्याचे विघटन होत नसल्याने अनेक समस्या उद्भवतात. त्या अनुषंगाने खाता येणाऱ्या या कपांमुळे पर्यावरण प्रदुषण आटोक्यात आणायला मदत मिळेल.

Leave a Comment