कर्णधारपदावरुन सरफराज अहमदची हकालपट्टी


कराची – पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आपल्या टी२० आणि कसोटी संघाचे कर्णधार नेमले असून टी२० संघांच्या कर्णधारपदावरून या दौऱ्यासाठी सरफराज अहमदची उचलबांगडी करण्यात आली असून बाबर आझमला कर्णधारपद देण्यात आले आहे. बाबर आझम टी-२० क्रिकेटमधील फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

सरफराजकडेच पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व राहणार का हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पण, अझहर अलीकडे कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. याबाबत पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सरफराज अहमदचे कर्णधारपद काढून घेण्यात यावे, अशी शिफारस प्रशिक्षक मिसबाह उल हकने पीसीबीला केली होती. तेव्हाच सरफराजचे कर्णधारपद धोक्यात आले होते.

सरफराजचे नेतृत्व २०१७ चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर कमकुवत ठरले होते. विश्वचषक स्पर्धेत सरफराजच्या नेतृत्वात पाकिस्तान उपांत्य फेरी गाठू शकला नाही. त्यानंतर घरच्या मैदानावर दुबळ्या श्रीलंका संघाने पाकिस्तानचा टी-२० मालिकेत ३-० ने पराभव केला आहे.

Leave a Comment