आता स्वतः चालवा ओला कार

कॅब सर्विस कंपनी ओलाने ग्राहकांसाठी एक खास सर्विस सुरू केली आहे. कंपनीने नवीन ‘ओला ड्राईव्ह कार शेअरिंग’ सर्विस लाँच केली आहे. यामध्ये ग्राहक भाड्याने कार घेऊन स्वतः चालवू शकतील.

या शहरात सुरू झाली सेवा –

ओला ड्राईव्ह कार शेअरिंग सर्विस सर्वात प्रथम बंगळुरूमध्ये सुरू करण्यात आली आहे. लवकरच दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या शहरांमध्ये देखील ही सेवा सुरू होईल. कंपनी 2020 अखेरपर्यंत 20 हजार कार या सर्विसमध्ये सहभागी करेल.

2 तासांसाठी घेऊ शकाल कार –

या सर्विसमध्ये ग्राहक 2 तास ते 3 महिन्यांपर्यंत कार भाड्याने घेऊ शकतील. यासाठी कार पिक अप आणि ड्रॉपसाठी रेसिडेंशियल आणि कमर्शियल हब देखील बनवले जाणार आहेत. ग्राहक केवळ 2 हजार रूपये सिक्युरिटी डिपॉजिट भरून ही कार घेऊन जाऊ शकतील.

ग्राहकांना होणार फायदा –

कंपनीनुसार, सेल्फ ड्रायव्हिंग कारमुळे ग्राहकांची अन्य कॅब प्रोवाईडरच्या तुलनेत 30 टक्के बचत होईल. याशिवाय ग्राहक भाडे देण्याचे पॅकेज किलोमीटर, तास आणि फ्यूलप्रमाणे आपल्या हिशोबाने डिझाईन करू शकतील. खास गोष्ट म्हणजे ग्राहकाने निवडलेल्या अंतरासाठीच पैसे द्यावे लागतील.

मिळणार या सेवा –

या सर्विस अंतर्गत प्रवास करणाऱ्या ग्राहकांना कारमध्ये 24 तास रोडसाइड असिस्टेंस सुविधा मिळेल. हेल्पलाईन नंबर 24 तास सुरू असेल. ओलाच्या या सर्विस कारमध्ये 8 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. ज्यात जीपीएस, मीडिया प्लबॅक आणि ब्लूटूथ कनेक्टिविटी सारखे फीचर्स मिळतील. यात नेविगेशन टूल देखील इनबिल्ट मिळेल. कारची संपुर्ण लिस्ट अपवर मिळेल.

Leave a Comment