नासाच्या या महिला अंतराळवीर रचणार इतिहास

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या महिला अंतराळवीर ख्रिस्टिनी कोच आणि जेसिका मेयर आज इतिहास रचणार आहेत. त्या अंतराळात स्पेसवॉक करणार आहेत. नासाने दिलेल्या माहितीनुसार, अंतराळात महिलांद्वारे आयोजित केलेला हा पहिला स्पेसवॉक आहे.

आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये असलेले इतर 4 पुरूष अंतराळवीर आतच राहतील. कोच आणि मेयर तुटलेली बॅटरी चार्जरला बदलण्यासाठी बाहेर जातील.

याबाबत एका व्हिडीओमध्ये ख्रिस्टिनाने म्हटले की, भूतकाळात देखील महिला केवळ एका जागी बसून राहिलेल्या नाहीत. जेव्हा सर्वांची भूमिका महत्त्वपुर्ण असते तेव्हाच यश मिळते.

जेसिका मेयरची ही पहिलीच स्पेसवॉक आहे तर ख्रस्टिना कोच चौथ्यांदा स्पेसवॉक करणार आहे. सोशल मीडियावर युजर्स या दोन महिला अंतराळवीरांना शुभेच्छा देत आहेत.

 

Leave a Comment