विहिरीमधून 73 कोटींचे पाणी चोरी केल्या प्रकरणी 6 जणांविरोधात तक्रार दाखल

पाणी चोरण्याच्या आरोपाखाली मुंबईमधील आझाद नगर पोलिस स्टेशनमध्ये 6 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मागील 11 वर्षांपासून दोन विहिरी खोदून त्यांनी 73 कोटी रूपयांचे भूजल चोरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी बोमनजी मास्टर लेन आणि पंड्या मँशनचे मालक त्रिपुरा प्रसाद नानालाल पंड्या, त्यांचे कंपनीचे दोन डायरेक्टर्स प्रकाश पंड्या आणि मनोज पांड्या, तीन वॉटर टँकर ऑपरेटर्सच्या विरोधाता तक्रार दाखल केली आहे. पोलिंनी सांगितले की, त्यांनी बेकायदेशीररित्या विहिरी खोदल्या होत्या व त्यात पंप लावून पाणी काढले.

एफआयआरनुसार, या लोकांनी आतापर्यंत 6.1 लाख टँकर पाणी आतापर्यंत विकले आहे. प्रत्येत टँकरमध्ये 10000 लीटर पाणी येते. 11 वर्ष प्रत्येक टँकरला सरासरी 1200 रूपयांनी विकण्यात आले. या हिशोबाने त्यांनी 73.19 कोटी रूपये कमवले आहेत.

मद्रास उच्च न्यायालयाने 2018 मध्ये म्हटले होते की, बेकायदेशीररित्या भूजलाचा वापर करणाऱ्यांना आयपीसी अंतर्गत शिक्षा दिली जाऊ शकते. भूजलाची एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी करण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.

Leave a Comment