मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी 9 हजार अब्ज रूपये मार्केट कॅपिटल (बाजार भांडवल) असणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांनी वाढ झाली. त्यानंतर कंपनीचे शेअर 1,423 रूपयांवर पोहचले होते. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये जानेवारी ते आतापर्यंत 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एवढे अब्ज भांडवल असणारी पहिली भारतीय कंपनी बनली रिलायन्स
रिपोर्टनुसार, 14 पैकी 10 तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीजचे नेट प्रॉफिट 11,256 कोटी रूपयांपर्यंत पोहचेल. तर 9 तज्ञांचे म्हणणे आहे की, कंपनीचे उत्पन्न 1.51 हजार अब्जांवर पोहचेल. जिओच्या स्बस्क्राईबर्स वाढत असल्याने तिमाहीत वाढ होण्याची शक्यता आहे.
बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स ही भारतातील पहिली कंपनी असेल जिचे बाजार भांडवल पुढील दोन वर्षात 200 अब्ज डॉलरपर्यंत पोहचेल. नवीन कॉमर्स वेंचर, फिक्स ब्रॉडब्रँड ऑपरेटर आणि डिजिटल एनिशिटिव्हमुळे भांडवल वाढेल.