क्रिकेटच्या इतिहासात या 5 गोलंदाजांनी सर्वाधिक फलंदाज केले आहे क्लीन बोल्ड


क्रिकेट हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा पसंतीचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये बॅट आणि बॉल दोन्हीचा थरार समान असतो. प्रत्येक चौकार, षटकार आणि विकेट्सवर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांचा चेहरा फुलतो. या काळात फलंदाज तर कधी गोलंदाज एकमेकांवर भारी पडतो. हेच या खेळाचे वैशिष्ट्य आहे. आज आम्ही तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासातील 5 महान गोलंदाजांबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाजांना क्लीन बोल्ड करुन सर्वाधिक विकेट मिळवले आहेत.

1. मुथय्या मुरलीधरन
श्रीलंकेचा माजी ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन हा क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. मुरलीधरन 1992 ते 2011 पर्यंत श्रीलंकेकडून क्रिकेट खेळला. या दरम्यान, मुरलीने एकूण 495 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 22.86 च्या सरासरीने 1347 बळी घेतले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुरलीने सर्वाधिक 290 फलंदाजांना क्लीन बोल्ड केले आहे.

2. वसीम अक्रम
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याला ‘सुलतान ऑफ स्विंग’ असे म्हटले जाते. एकूण 460 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर त्याने 916 बळी घेतले. वसीमने 356 एकदिवसीय सामन्यांमध्ये 502 बळी घेतले तर 104 कसोटी सामन्यांमध्ये 441 बळी घेतले. या दरम्यान, वसीम अक्रमने 278 फलंदाजांना क्लीन बोल्ड केले.

3. वकार युनूस
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार युनूस होता. वकारने एकूण 349 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 789 बळी घेतले. सर्वाधिक फलंदाजांना क्लीन बोल्ड करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 253 फलंदाजांना क्लीन बोल्ड केले.

4. अनिल कुंबळे
भारतीय लेगस्पिनर अनिल कुंबळे 1990 ते 2008 या काळात भारताकडून खेळला होता. या दरम्यान, कुंबळेने एकूण 403 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 30.09 च्या सरासरीने 956 बळी घेतले. त्याने कसोटी सामन्यात 619 विकेट्स आणि एकदिवसीय सामन्यात 337 बळी घेतले. या दरम्यान कुंबळेने 186 फलंदाजांना क्लीन बोल्ड केले आहे.

5. जेम्स अँडरसन
या यादीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन पाचव्या क्रमांकावर आहे. अँडरसनने 2002 पासून इंग्लंडकडून 149 कसोटी सामन्यात 575 विकेट्स घेतल्या आहेत आणि 194 एकदिवसीय सामन्यात 269 बळी आणि 19 टी -20 सामन्यात 18 बळी घेतले आहेत. अँडरसनने एकूण 362 आंतरराष्ट्रीय सामने खेळून 180 फलंदाजांना क्लीन बोल्ड केले आहे.

Leave a Comment