उसेन बोल्ट पेक्षाही वेगवान आहे ही मुंगी

सहारा वाळवंटातील ‘सिल्वर अँट’ ही जगातील 12000 मुंग्यांच्या प्रजातींपैकी सर्वात वेगवान मुंगी आहे. या मुंगीचा वेग एक मीटर प्रती सेंकद मोजण्यात आला आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचे तर सहा पायांची ही मुंगी प्रती सेंकदाला आपल्या लांबीपेक्षा 108 पट अधिक अंतर पार करते.

वेगाच्या बाबतीत या मुंगीपेक्षा दोनच जीव पुढे आहेत. ज्यातील एक ऑस्ट्रेलियातील बीटल प्रजातीचा वाघ बीटल आणि कॅलिफोर्नियातील कोस्टल माइट (भुंगा) हे आहेत.

संशोधकांनी सांगितले की, आम्हाला माहिती होते की, हा जीव वेगवान आहे. मात्र एवढा वेगवान असेल याची कोणालाच कल्पना नव्हती. आपल्या सहा पायांमुळे ही मुंगी एवढ्या वेगाने अंतर पार करण्या मागचे मुख्य कारण आहे.

आकार आणि वजनाच्या हिशोबाने या मुंगीच्या समकक्ष येण्यासाठी जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टला 200 मीटर प्रती सेंकद या वेगाने धावावे लागेल.

एक्सपेरिमेंटल बायोलॉजी जर्नलमध्ये संशोधकांनी सांगितले आहे की, सहारामध्ये ही मुंगी जेथे दिवसा तापमान 60 डिग्री सेल्सियस (140 डिग्री फॉरेनाइट) पर्यंत पोहचते अशा रेतीवर अन्न शोधण्यासाठी चालत असते.

जर्मनीतील युनिवर्सिटी ऑफ उल्म आणि फ्रीबर्गच्या संशोधकांनी ट्यूनिशियाच्या वाळवंटात या मुंगीचा अभ्यास केला. मुंगीचा तापमानाशी काही संबंध आहे की नाही, याची माहिती संशोधकांना घ्यायची होती.

Leave a Comment