‘दबंग’च्या ‘रज्जो’ने देखील साजरा केला करवा चौथ


अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ‘दबंग ३’ या चित्रपटात ‘रज्जो’ची भूमिका साकारत आहे. काल करवा चौथचा सण साजरा करण्यात आला. करवा चौथ हा उत्तर भारतीय हिंदू सण आहे. विवाहित स्त्रिया आश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुरोग्यासाठी पूर्ण दिवस उपवास करतात. संध्याकाळी चंद्र उगवल्यावर चाळणीतून प्रथम चंद्राचे दर्शन व नंतर पतीचा चेहरा पाहतात. क्वचित अविवाहित स्त्रियाही आपल्या इच्छित पतीसाठी हे व्रत करतात. हा सण दंबगची रज्जोही साजरा करीत असल्याचा एक फोटो सध्या चर्चेत आहे.


सलमान खानच्या ‘दबंग ३’ या आगामी चित्रपटातील रज्जोचा म्हणजेच सोनाक्षी सिन्हाचा फोटो ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केला आहे. रज्जो या मध्ये हातात चाळण घेऊन चंद्राकडे पाहाताना दिसत आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर यांची मुलगी सई हिचीदेखील मुख्य भूमिका आहे. तिची आणि सलमान खानची केमेस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्रभू देवाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर २० डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment