अडगळीतील आफ्रिकन मोनालिसाच्या पेंटिंगला मिळाले १० कोटी


प्रत्येकाच्या घरात अनेक वस्तू अडगळीत पडलेल्या असतात. अनेकदा त्या मौल्यवान असू शकतात पण अज्ञानातून त्यांच्याकडे लक्ष दिले जात नही. नायजेरियातील एका कुटुंबाला असाच अनुभव नुकताच आला. या कुटुंबात घरात एक जुने पुराने पेंटिंग पडले होते. एक दिवस या कुटुंबाला काय वाटले कोण जाणे पण त्यांनी या पेंटिंगवर असलेली चित्रकाराची सही गुगल केली आणि त्यांचे भाग्य फळफळले. या कुटुंबांच्या दृष्टीने मातीमोल असलेल्या या पेंटिंग ला लिलावात तब्बल ११ लाख पौंड म्हणजे १० कोटी रुपये किंमत मिळाली.

नायजेरियन चित्रकार बेन इनवॉनवू याने १९७१ मध्ये लागोस या ठिकाणी हे पेंटिंग बनविले असून चित्रातील महिला इफिची राजकुमारी एडीतूतू ही आहे. तिला आफ्रिकन मोनालिसा असे म्हटले जात असे. बेनने तिची तीन पेंटिंग बनविली होती. बेनला २० व्या शतकातला आफ्रिकन आधुनिक पितामह म्हटले जाते.

नायजेरियन कुटुंबाकडे हे पेंटिंग १९७१ पासून आहे. त्यांनी जेव्हा कलाकाराची सही गुगल केली तेव्हा लंडनच्या प्रसिद्ध सोथबे लिलाव कंपनीने फ्री ऑनलाईन एस्टीमेट प्लॅटफॉर्मवर ही सही पहिली तेव्हा ते चकित झाले. त्यांनी या चित्राचा लिलाव पुकारला तेव्हा त्याला अपेक्षेपेषा ७ पट अधिक किंमत मिळाली. बुकर विजेते बेन ओकरी या चित्रासंदर्भात म्हणाले, हे पेंटिंग नायजेरियाचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे. चित्रकाराचा १९९४ मध्ये मृत्यू झाला. त्याने या राजकुमारीची तीन पेंटिंग बनविली होती. १९६० च्या दशकात नायजेरिया आणि ब्रीयाफ्रान संघर्षात ही पेंटिंग शांतीचे प्रतिक ठरली होती.

Leave a Comment