टेस्लाला टक्कर देणार चीनी शीपेंग पी ७ ई कार


आंतरराष्ट्रीय बाजारात बेस्ट इलेक्ट्रिक कारची चर्चा होत असेल तर पहिले नाव समोर येते ते टेस्ला कारचे. मात्र आता या कारला टक्कर देण्यासाठी चीनी शिपेंग पी ७ इलेक्ट्रिक कार सज्ज झाली आहे. या कारमध्ये किंमत, परफॉर्मन्स आणि लग्झरी याचा परफेक्ट बॅलंस साधला गेला आहे. त्यामुळे आत्ताच ती ग्राहकांचे आकर्षण ठरली असून सोशल मीडियावर ही इलेक्ट्रिक सेदान चांगलीच चर्चेत आली आहे. पुढच्या वर्षात ही कार चीनमध्ये लाँच होणार आहे.

कंपनी या कारच्या ग्लोबल लाँचिंगची तयारी करत असल्याचे कंपनीचे उपाध्यक्ष ब्रायन ग्यू यांनी सांगितले. पाच वर्षे जुनी स्टार्टअप कंपनी या कारची उत्पादक असून या चार दरवाजे असलेल्या कारची रेंज एका चार्ज मध्ये ६०० किमीची आहे. या कारमध्ये टेस्ला आणि वोक्सवॅगन प्रमाणेच सर्व ऑटो फिचर्स दिले गेले आहेत. ही कार ४ सेकंदात ० ते १०० किमीचा वेग घेते. या कारला आफ्टर सेल सर्विस सुविधा आहे शिवाय येणारी नवीन फंक्शन्स वेळोवेळी दिली जाणार आहेत. या कारची किंमत ३२ हजार डॉलर्स म्हणजे २२,८३,००० रुपये आहे.

उपाध्यक्ष ग्यू यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा उद्देश फक्त इलेक्ट्रिक कार बनविणे हा नव्हता तर त्यांना इंटेलिजंट, ऑटोनॉमस कार बनवायची होती. या कंपनीने या पूर्वी जी ३,२०२० व जी ३, २०१९ या दोन इलेक्ट्रिक एसयूव्ही बनविलेल्या असून शिपेंग पी ७ ही सेकंड जनरेशन कार आहे.

Leave a Comment