अमिताभ बच्चन हॉस्पिटलमध्ये दाखल


बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन उर्फ बिग बी गेले तीन दिवस मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल असून त्यांना मंगळवारी २ वा. च्या सुमारास त्रास सुरु झाल्याने या रुग्णालयात दाखल केले गेल्याचे समजते. अमिताभ हॉस्पिटल मध्ये असल्याची बातमी गुप्त ठेवण्यात आली आणि त्यांना भेटण्यास फक्त घराच्या लोकांना परवानगी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

अमिताभ बच्चन याना गेली अनेक वर्षे यकृताचा आजार असून त्याचे यकृत ७५ टक्के खराब झालेले आहे याचा खुलासा यांनी नुकताच केला होता. १९८२ मध्ये कुली या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान त्यांना झालेल्या जीवघेण्या अपघाताच्या वेळी त्यांना जे रक्त चढविले गेले होते त्यामुळे त्यांना संसर्ग झाला होता. हे रक्त हेपीटायटीस विषाणू असलेले होते आणि त्यामुळे अमिताभला लिव्हर सिरोसिसचा त्रास होऊ लागला होता.

नानावटी रुग्णालयात अमिताभ यांच्यावर नेहमीच उपचार करणारे डॉ. बर्वे हेच यावेळीही त्यांच्यावर उपचार करत आहेत. अमिताभला विशेष रूममध्ये दाखल केले गेले असल्याचे व त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचेही सांगितले जात आहे. अमिताभ यांचा नुकताच, १२ ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा झाला आणि तो अगदी साधेपणाने साजरा केला गेला होता. सध्या अमिताभ कौन बनेगा करोडपती होस्ट करत आहेत आणि त्याच्या ब्रह्मास्त्र चित्रपटचे शुटींग सुरु आहे.

Leave a Comment