वैज्ञानिकांनी केला मंगळ आणि चंद्रावरही उगवता येतील भाज्या असा दावा

नासाच्या वैज्ञानिकांनी कृत्रिम पध्दतीने मंगळ ग्रह आणि चंद्रा सारखे वातावरण आणि माती तयार करून त्याच्यात पीक उगवण्यास यश मिळवले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, भविष्यात मंगळ आणि चंद्रावर मानव राहू लागला तर तेथे खाद्यपदार्थ उगवले जाऊ शकतात.

नेदरलँडच्या वगेनिंगेन युनिवर्सिटीच्या संशोधकांनी हे देखील म्हटले की, मंगळ आणि चंद्रावर लावण्यात येणाऱ्या पीकांद्वारे बियाणे देखील मिळण्याची शक्यता आहे. जेणेकरून त्याचा वापर करून नवीन पीक घेता येईल. त्यांनी टोमॅटो, मुळा, पालक, वाटाणा आणि मोहरी यासारख्या अनेक पीकांचे उत्पादन केले आहे

वगेनिंगेन युनिवर्सिटीचे प्रोफेसर वीगर वेमलिंक यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही कृत्रिम पध्दतीने तयार करण्यात आलेल्या मंगळ ग्रहावरील मातीमध्ये लाल टॉमॅटो उगवताना पाहिले तेव्हा आम्ही खूप उत्साहित झालो.

संशोधकांनी मंगळ ग्रह आणि चंद्रावरील मातीमध्ये सामान्य माती मिसळून कृत्रिम पध्तीने असे वातावरण तयार केले आहे.

 

Leave a Comment