ही आहेत जगातील टॉप 10 उदयोन्मुख पर्यटन स्थळ

आजपर्यंत परदेशी पर्यटक भारतात सर्वाधिक प्रमाणात ताजमहाल असलेल्या आग्रा शहराला भेट देत असे. मात्र आता आग्राला  परदेशी पर्यटकांनी भेट देणे कमी केले आहे. आता परदेशी पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र जोधपुर बनले आहे.

डिजिटल ट्रॅव्हल लिडर बुकिंग.कॉमने 2020 मध्ये सर्वाधिक आवडती शहर कोणती असतील याची यादी जाहीर केली आहे. इस्टर्न युरोप आणि आशियामधील या शहरांच्या यादीमध्ये जोधपुरचा देखील समावेश आहे.

जोधपुर हे जगातील सर्वात कलरफुल शहरांपैकी एक आहे. नैसर्गिक सौदर्याने नटलेले हे शहर नक्कीच एकदा पाहायला हवे. याशिवाय येथील मेहरगड किल्ला, उमेद भवन पॅलेस आणि मंदौर गार्डन यासारख्या अनेक गोष्टी या ठिकाणी पाहण्यासारख्या आहेत.

बुकिंग.कॉमनुसार टॉप-10 उदयोन्मुख शहर –

(Source)

ग्झिरा, माल्टा –

2020 मधील बीच ट्रिपसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. माल्टाच्या उत्तर पुर्व भागात असलेल्या या शहरातून माल्टाची राजधानी वेलेटा देखील सहज दिसते. मानोईल आयलंडला देखील तुम्ही भेट देऊ शकता. याशिवाय 1726 मध्ये आयलंडला लागून बनवण्यात आलेला मानोईल हा ऐतिहासिक किल्ला देखील तुम्ही पाहू शकता.

(Source)

निन्ह बिन्ह, व्हिएतनाम –

निन्ह बिन्ह हे व्हिएतनाममधील शहर पाण्याने व्यापलेले आहे. या शिवाय येथे तुम्हा पर्वत रांगा, नदी, गुहा, भाताची शेती आणि पागोडा (मंदिर) अशा अनेक गोष्टी बघायला मिळतील. येथील बोटीचा प्रवास तुम्हाला एखाद्या चित्रपटासारखाच वाटेल.

(Source)

साल्टा, अर्जेंटिना –

साल्टा हे शहर अर्जेंटिनाचा मोठमोठ्या पर्वतरांगाच्या मध्यभागी वसलेले आहे. तुम्ही येथे 9 डे जुलीओ प्लाझाला भेट देऊ शकतात. याचबरोबर 1600 व्या शतकात बनलेल्या सॅन फ्रँसिस्को या ऐतिहासिक चर्चला देखील पाहू शकता. याशिवाय येथील द हिल ऑफ सेव्हन कलर्स आणि सॅलिनास ग्रँड्स (मीठाची जमीन) देखील प्रसिध्द आहे.

(Source)

सिओग्विपो, दक्षिण कोरिया –

जेजू आयलंड, सिओग्विपो हे दक्षिण कोरियामधील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. समुद्र किनाऱ्यांनी वेढलेल्या या शहरात ट्रॅव्हलर्स आणि एडव्हेंचर्स स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकतात. ट्रेकिंगची आवड असणारे हलसन किल्ल्याला भेट देऊ शकतात. येथील चिओनजिऑन आणि जिऑनबँग हे धबधबे देखील प्रसिध्द आहेत. याचबरोबर येथील पारंपारिक कोरियन हॉटेलमधील पदार्थ देखील तुमच्या तोंडाला पाणी आणतील.

(Source)

स्विनोझस्की, पोलंड  –

पोलंडच्या वायव्यला असलेले हे शहर समुद्राची आवड असलेल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. याशिवाय पर्यटक म्युझियम ऑफ सी फिश्रीला भेट देऊन समुद्रातील वेगवेगळ्या जीवांची माहिती घेऊ शकतात. पर्यटक समुद्रावर वॉटर स्पोर्ट्सचा देखील आनंद घेऊ शकतात.

(Source)

तकामत्सू, जापान –

तकामत्सू हे उडॉन किंगडम आणि गेटवे ऑफ शिकॉकू म्हणू देखील ओळखले जाते. हे एक बंदरांचे शहर आहे. येथे तुम्ही प्रसिध्द इंगेत्सु क्यो ब्रिजला भेट देऊ शकता. याशिवाय कमळांनी भरलेले तलाव आणि रिटसुरीन पार्क नक्की भेट द्या. पार्कमध्ये तुम्ही पारंपारिक जापानी चहाचा आनंद घेऊ शकतात.

(Source)

सॅन जुआन, प्युर्टो रिको

प्युर्टो रिकोची राजधानी असलेले सॅन जुआन शहर आपल्या आर्किटेक्चर आणि विभिन्न संस्कृतीसाठी ओळखले जाते. येथील स्पॅनिश कॉलोनियल ब्लिडिंग्स तुम्ही पाहू शकता. ज्यांना हटके कंस्ट्रक्शन आणि डिझाईन्सची आवड आहे ते इल मारो, कास्टिलो डे सॅन ख्रिस्टोबल आणि पासिओ डे ला प्रिन्सेआला देखील भेट देऊ शकतात.

(Source)

झॅब्लझॅक मॉन्टेनेर्गो –

एखाद्या हटक्या ठिकाणी भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांनी मॉन्टेनेर्गामधील लहानसे शहर झॅब्लजॅकला या पर्वतांनी ओढलेल्या शहराला नक्की भेट द्यावी. वर्षातील कोणत्याही काळात तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. डर्मिटोर नॅशनल पार्क, ब्लॅक लेक आणि ज्युरेडेजेविक तारा ब्रिज हा युरोपमधील सर्वात मोठा अर्क ब्रिज आहे.

(Source)

येरेवान, अर्मेनिया –

इतिहासाची आवड असणाऱ्या अर्मेनियाची राजनाधी असलेल्या येरेवानला नक्कीच भेट द्यायला हवी. येथील आर्किटेक्चर तुमचा प्रवास अविस्मरणीय करेल. येथे सर्वाधिक मोठे कॅथेड्रेल्स (चर्च) देखील आहे. शहरातील प्रसिध्द स्थळ बघताना येथील  कॅसकेडला (छोटा धबधबा) भेट देण्यास नक्कीच विसरू नका.

Leave a Comment