आता बदलणार भारतातील ‘पाकिस्तान’चे नाव


पूर्णिया (बिहार) – येथील लोकांनी आता अधिकाऱ्यांच्या मार्फत लोकप्रतिनिधींकडे पाकिस्तानचे नाव बदलण्याचे आवाहन केले आहे. आता पाकिस्तानचे नाव बदलण्यात येईल, असेही आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. होय, ही बातमी वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, परंतु ही शंभर टक्के खरी आहे.

देशाच्या शेजारील देश पाकिस्तानशिवाय बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातही एक पाकिस्तान आहे, जिथे लोकांनी आता आपल्या गावाचे (टोला) नाव बिरसानगर असे बदलण्याची मागणी केली आहे.

गावकरी म्हणतात की पाकिस्तानचे नाव पडल्यामुळे त्यांना मान खाली घालावी लागते. पूर्णिया जिल्ह्यातील श्रीनगर ब्लॉकमधील सिंधिया ग्रामपंचायतीच्या पाकिस्तान गावच्या लोकांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गावचे नाव बदलण्यासाठी सामूहिक अर्ज केला आहे.

पूर्णियाचे जिल्हाधिकारी राहुल कुमार यांनी गुरुवारी आयएएनएसला सांगितले की अद्याप अर्ज त्यांच्याकडे आलेला नाही. पण जर अशी परिस्थिती असेल तर त्या गावाचे नाव बदलण्यासाठी पुढाकार घेतला जाईल.

गावकर्‍यांचे म्हणणे आहे की गावाचे नाव पाकिस्तान असल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. गावकरी असेही म्हणतात की त्या गावचे नाव पाकिस्तान असल्यामुळे मुला-मुलींचे लग्न ठरवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

पूर्णिया जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 35 कि.मी. अंतरावर या गावात फक्त आदिवासी राहतात. भगवान बिरसा मुंडाच्या नावावरून पाक गावचे नाव बिरसा नगर असे ठेवण्याचे येथील लोकांनी ठरविले आहे.

श्रीनगरचे बीडीओ नंदन कुमार म्हणाले की, गावचे नाव बदलण्याच्या उद्देशाने गावातील लोकांनी जिल्हाधिकारी यांना सामूहिक अर्ज सादर केला आहे. ते म्हणाले की कोणत्याही जागेचे नाव बदलण्याचा निर्णय त्यांच्या कार्यक्षेत्रात नाही, हा अर्ज आपण जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवत आहेत.

गावकऱ्यांनी अर्जात लिहिले आहे की दरदिवशी पाकिस्तान भारतात दहशतवाद पसरवित आहे आणि भारताला विरोधात गरळ ओकणे आता सहनशीलतेच्या बाहेर आहे. आता येथील जनता पाकिस्तानच्या नावावर वैतागली आहे, काराण गावातल्या लोकांनी एकत्रितपणे त्यांच्या गावचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

येथे पूर्णियाचे खासदार संतोष कुशवाहही ग्रामस्थांच्या या मागणीच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. कुशवाहा म्हणतात ग्रामीण लोक असे म्हणत असतील तर त्यास पाठिंबा द्यावा. या बाबतीत त्यांना नक्कीच मदत करेन असेही ते म्हणाला.

Leave a Comment