नोकियाचा 1599 रूपयांचा फीचर फोन लाँच

नोकिया कंपनीने नोकिया 110 (2019) हा फीचर फोन भारतात लाँच केला आहे. नोकिया 110 हा खासकरून गाण्याची आवड असणाऱ्यांसाठी बाजारात आणण्यात आला आहे. नोकिया 110 मध्ये कंपनीने रेडिओसोबतच आपल्या जुन्या फोनमधील प्रसिध्द सापाची गेम देखील यात दिली आहे.

नोकिया 110 ची भारतातील किंमत 1599 रूपये आहे. हा फोन ब्लॅक, ओशियन ब्लू आणि पिंक रंगामध्ये उप्लब्ध आहे. फोनची विक्री नोकियाची वेबसाईट आणि दुकानांमध्ये सुरू झाली आहे.

(Source)

या फोनमध्ये 1.77 इंचचा QQVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय यात  SPRD 6531E  प्रोसेसर आहे. स्टोरेजबद्दल सांगायचे तर यात 4 एमबी रॅम आणि 4 जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. यामध्ये मायक्रो युएसबी 2.0 पोर्ट देण्यात आला आहे.

(Source)

हा ड्युल सिम सपोर्ट फोन आहे. मेमरी कार्डसाठी देखील यात वेगळा स्लॉट देण्यात आलेला आहे. फोनमध्ये 32 जीबीपर्यंत मेमरी कार्ड सपोर्ट करते. यामध्ये 800 एमएएचची बॅटरी देण्यात आली असून, यात 14 तासांचा टॉकटाईम मिळेल असा दावा करण्यात आला आहे.

(Source)

याशिवाय कंपनीने दावा केला आहे की, लगातार 27 तास एमपी3 प्लेबॅक आणि 18 तास एफएम प्लॅबॅकमध्ये देखील फोन चालेल. खास गोष्ट म्हणजे यात रिअर कॅमेरा देखील देण्यात आला असून, जो प्लॅश लाईटसोबत आहे.  यात तुम्ही तुमच्या आवडीच्या गेम्स देखील खरेदी करू शकता.

Leave a Comment