नाथाभाऊंचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीकडून होती विरोधीपक्ष नेत्याची ऑफर


जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी कोणत्याही पवारांशी संपर्क नसल्याचे ठासून सांगितल्यानंतर आता राष्ट्रवादीसमोर गुगली टाकली आहे. आपल्याशी संपर्क साधून विरोधी पक्षनेतेपदाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपने तिकिटाचा पत्ता कापल्यावर खडसे यांना भेटल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची खडसेंना ऑफर होती. खडसेंनी याबाबत इन्कार केला होता. पण आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण देऊन विरोधी पक्षनेतेपदाची राष्ट्रवादी काँग्रेसने ऑफर दिल्याचा दावा खडसेंनी केला आहे.

कोणत्याही पवारांना गेली तीन वर्षे भेटलेलो नाही, असे माध्यमांसमोर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. आपल्याशी संपर्क करून मला राष्ट्रवादीत येण्याची ऑफर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली होती. पण आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदाची ऑफर दिल्याचे आता खडसे सांगत सुटले आहेत. खडसे भुसावळमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलत होते.

त्यांनी त्याचवेळी म्हटले की, उमेदवारी मला मिळणार नाही, अशी सूचना दोन महिन्यांपूर्वीच मिळाली होती. मुख्यमंत्री आणि माझ्यात त्यासंदर्भात चर्चा झाली होती. राज्यपालपदाची ऑफर मला देण्यात आली होती. राज्यपाल बनून गप्प बसायचे का? जनतेला वाऱ्यावर सोडायचे का, असा प्रश्न खडेस यांनी यावेळी उपस्थित केला.

Leave a Comment