2024 च्या चंद्रावरील मिशनसाठी नासाने लाँच केला नवीन स्पेस सूट

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने पुढील पिढीतील अंतराळवीरांसाठी स्पेस सूट सादर केला आहे. 2024 साली होणाऱ्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मिशनसाठी या स्पेस सूटचा वापर करण्यात येईल.

नासाचे प्रशासक जिम ब्रिडेनस्टाइन या चंद्रावरील मिशनसाठी महिला आणि पुरूष अशा दोन्हींसाठी स्पेस सूटची डिझाईन सादर केले आहे. लाल, पांढरा आणि निळ्या रंगातील हा सूट कोणत्याही तापमानातील दबाव सहन करू शकतो. यातील एक स्पेसवॉकसाठी तर दुसरा सूट अंतराळवीरांचे विकिरण, खूपच कमी व जास्त तापमानात बचाव करेल. हा सूट चंद्रावरील मायन्स 250 डिग्री सेल्सियस तापमानात देखील योग्य प्रकारे कार्य करेल.

2030 साली मंगळावर मनुष्याला पाठवण्याची योजना नासा बनवत आहे. याचबरोबर नासा 2024 पर्यंत पहिल्यांदाच चंद्रावर महिला अंतराळवीराला पाठवण्याची तयारी करत आहे.

 

Leave a Comment