धोनी म्हणतो, मलाही राग येतो; मात्र…..

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा मैदानावर असो अथवा मैदानाच्या बाहेर आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. यामुळेच त्याला ‘कॅप्टन कूल’ असे देखील म्हटले जाते. सध्या धोनी क्रिकेटपासून लांब आहे आणि त्याच्या निवृत्तीच्या चर्चेला देखील उधाण आले आहे. दोन वेळा वर्ल्डकप विजेता असलेला धोनी विजय असो अथवा पराभव कोणत्याही प्रसंगी अगदी शांत असतो. याचविषयी बोलताना धोनीने भाष्य केले आहे.

धोनीने म्हटले की, मला देखील इतरांप्रमाणेच भावना आहेत, मात्र इतरांच्या तुलनेत मी त्यांच्यावर अधिक नियंत्रण ठेवतो. मला देखील राग येतो. मात्र नकारात्मकता तुम्हाला नष्ट करत असते.

धोनी म्हणाला की, मला देखील इतरांप्रमाणेच निराश वाटते, राग येतो, वाईट वाटते. मात्र यातील एकही भावना ही काहीही कामाची नाही. समस्येशी खेळत बसण्यापेक्षा त्यावर उपाय शोधणे गरजेचे असते. कोणता योग्य निर्णय घेता येईल, याचा मी विचार करतो. पुढील प्लॅन काय असेल ? पुढील कोणता खेळाडू असेल ज्याचा मी उपयोग करू शकेल ? या गोष्टींचा विचार करायला लागल्यावर मी माझ्या भावनांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेऊ शकतो.

सध्या महेंद्रसिंह धोनी क्रिकेटपासून लांब असून, वर्ल्ड कप नंतर धोनीने एकही सामना खेळलेला नाही.

Leave a Comment