सत्या नाडेला यांनी घेतले 306 कोटी रूपयांचे वार्षिक वेतन

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्या वेतन आणि भत्यात एका वर्षात 66 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 30 जूनला संपलेल्या मायक्रोसॉफ्टच्या आर्थिक वर्षात नाडेला यांना एकूण 4.29 कोटी डॉलर (306.43 कोटी रूपये) कम्पेंसेशन मिळाले आहे. यातील अधिकतर रक्कम ही शेअर्सची आहे. मागील आर्थिक वर्षात (2017-18) त्यांनी 2.58 कोटी डॉलरची (184.28 कोटी रूपये) कमाई केली होती. कंपनीने आपला वार्षिक रिपोर्ट सादर केला असून, त्यात ही माहिती समोर आली आहे. मायक्रोसॉफ्टचे आर्थिक वर्ष हे 1 जुलै ते 30 जून पर्यंत असते.

उद्योगाच्या वाढीसाठी आणि कंपनीच्या शेअर्सची रक्कम वाढवल्यामुळे कंपनीने नाडेला यांच्या कंम्पेंशनमध्ये वाढ केली आहे. असे असले तरी 2014 च्या तुलनेत हे कंम्पेंशन अर्धेच आहे. 2014 मध्ये नाडेला यांना 8.43 कोटी डॉलर मिळाले होते. नाडेला यांची सध्या संपत्ती 2100 कोटी असण्याची शक्यता आहे.

मायक्रोसॉफ्टकडून सांगण्यात आले आहे की, नाडेला यांच्या नेतृत्वाखाली मागील 5 वर्षात कंपनीच्या मार्केट कॅम्पमध्ये 509 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. या काळात कंपनीचे एकूण शेअर होल्डर रिटर्न 97 टक्क्यांनी वाढले आहे. यामुळे नाडेला यांचा पगार-भत्ता देखील वाढला आहे.

मायक्रोसॉफ्ट मागील वर्षी अपलला मागे टाकत जगातील सर्वात वॅल्युएशन असणारी कंपनी ठरली होती. मायक्रोसॉफ्टचे सध्या मार्केट कॅप 1072 अब्ज डॉलर आहे तर अपलचे 1059 अब्ज डॉलर आहे.

Leave a Comment