अर्धे शरीर मानवी तर अर्धे रोबोटिक, हे आहेत जगातील पहिले सायबोर्ग

ब्रिटनचे वैज्ञानिक डॉ. पीटर स्कॉट मॉर्गन यांनी मृत्यूसमोर हार पत्करण्यापेक्षा त्याच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. मासपेशींच्या गंभीर आजाराशी लढणारे पीटर हे आता मनुष्यातून सायबोर्ग (अर्धा मनुष्य, अर्धा रोबॉट) मध्ये बदलण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. सायबोर्ग म्हणजे असा रोबोट ज्यामध्ये मनुष्याचा मेंदू आणि काही भाग कार्य करत असतात.

डॉक्टरांनी त्यांना मोटर न्युरॉन डिसीज आहे असे सांगितले होते. तेव्हाच पीटर यांनी स्वतःला सायबोर्गमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला होता. मोटर न्युरॉन डिसीज आजारामध्ये रूग्णाच्या मांसपेशी काम करणे हळूहळू बंद करतात. आता पीटर स्वतःला पुर्णपणे सायबोर्गमध्ये बदलण्यास तयार असून, लोकांनी त्यांना पीटर 2.0 या नावाने बोलवावे अशी त्यांची इच्छा आहे.

डॉ. पीटर हे जगातील पहिले असे व्यक्ती आहेत, ज्यांच्या शरीरातील तीन भागांमध्ये यंत्र लावलेले आहेत. हे यंत्र लावण्यासाठी जून 2018 मध्ये अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. डॉक्टरांनी ऑपरेशनद्वारे त्यांच्या जेवणाच्या ट्यूबला थेट त्यांच्या पोटाशी जोडले. तसेच मुत्र साफ होण्यासाठी आणि मल बाहेर पडण्यासाठी देखील ऑपरेशन करण्यात आलेले आहे.

त्यांच्या चेहऱ्याला आकार देणारी शस्त्रक्रिया देखील करण्यात आलेली आहे. आता त्यांच्या चेहरा पुर्णपणे रोबोटिक झाला आहे. त्यामध्ये आर्टिफिशिय मांसपेशी लावण्यात आलेल्या आहेत. ते चेहऱ्यावर लावण्यात आलेल्या कंट्रोलिंग सिस्टमच्या मदतीने अनेक कॉम्प्युटर्स डोळ्यांच्या इशाऱ्यावरून चालवू शकतात. त्यांचे शेवटचे ऑपरेशन 10 ऑक्टोंबरला झाले. यावेळी त्यांचा मेंदू ऑर्टिफिशियल इंटेलिजेंसशी जोडण्यात आला व आवाज देखील बदलण्यात आला.

डॉ. पीटर म्हणाले की, माझा मृत्यू होत नसून, मी बदलत चाललो आहे. माझे शरीर हार्डवेअर, वेटवेअर, डिजिटल आणि एनालॉग होईल. मला माहितीये मनुष्य म्हणून माझा मृत्यू झाला आहे. मात्र सायबोर्ग म्हणून जिंवत आहे.

 

Leave a Comment