भारतातील या हॉटेलमध्ये जेवण सर्व करतात रोबॉट

जेव्हा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जातात तेव्हा तुमची ऑर्डर कोण घेते ? तुम्हाला जेवण कोण सर्व करते ? तुमचे उत्तर नक्कीच तेथे काम करणारी लोक असे असेल. मात्र तुम्हाला असे हॉटेल माहिती आहे का जेथे रोबॉट जेवण सर्व करतात. आता हे शक्य आहे आणि ते देखील भारतात.

भुवनेश्वरच्या एका रेस्टरॉंमध्ये दोन रोबॉटची जेवण सर्व करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेली आहे. हे दोन्ही रोबॉट भारतात बनवण्यात आले आहेत. भुवनेश्वरमधील अशाप्रकारचे हे पहिलेच हॉटेल आहे.

या हॉटेलचे मालक जीत बासा यांनी सांगितले की, या रोबॉटचे नाव चंपा आणि चमेली ठेवले आहे. हे दोन्ही रोबॉट स्वदेशी बनावटीचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

(Source)

जीत बासा यांनी दावा केला आहे की, पुर्व भारतात रोबोट सुविधा देणारे हे पहिले हॉटेल आहे. हे दोन्ही रोबॉट रडारच्या माध्यमातून कार्य करतात. या रोबॉटना कमांड दिले जाते. हे दोन्ही रोबॉट अनेक भाषा बोलू शकतात. या ओडियाचा देखील समावेश आहे.

या प्रकारचा हटके अनुभव मिळत असल्याने स्थानिक लोक देखील खुष आहेत. हे रोबॉट येणाऱ्या ग्राहकांचे वेगवेगळ्या स्वदेशी भाषा बोलून स्वागत करतात.

Leave a Comment