ऐन दिवाळीच्या तोंडावर तब्बल 6 दिवस बंद राहणार बँका


मुंबई : ऑक्टोबर महिना संपायला आता अवघे काहीच दिवस उरेल आहेत. पण या 14 दिवसांमध्ये देशातील वेगवेगळ्या ठिकाणी अनेक बँका बंद राहणार आहेत. या 14 दिवसांपैकी सहा दिवस बँकेचे कामकाज होणार नसल्यामुळे जर बँकेचे तुमचे कुठले महत्त्वाचे काम राहिले असेल तर लवकर करुन घ्या.

देशातील अनेक बँका 31 ऑक्टोबरपूर्वी वेगवेगळ्या कारणांसाठी बंद राहातील. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, 10 बँकांच्या विलिनीकरणाविरोधात 22 ऑक्टोबरला बँक संघटनेने संप पुकारला आहे. आता ट्रेड युनिअन काँग्रेसने (एटक) ही अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना आणि भारतीय रिझर्व्ह बँक कर्मचारी परिसंघाच्या या संपाला समर्थन दिले आहे. जर हा संप झाला तर 22 ऑक्टोबरला बँका बंद राहातील.

10 बँकांच्या विलिनीकरणाची घोषणा काही दिवसांपूर्वी सरकारने केली होती. या विलिनीकरणानंतर 4 नव्या बँक अस्तित्वात येतील. तर आंध्र बँक, इलाहबाद बँक, सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या अस्तित्वात राहणार नाही.

22 ऑक्टोबरपूर्वी 20 ऑक्टोबरला रविवार असल्याने बँकांना सुट्टी आहे. तर 26 ऑक्टोबरला चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे. म्हणजेच दिवाळीपूर्वी (27 ऑक्टोबर) तीन दिवस बँका बंद राहातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला दिवाळी आणि रविवार असल्याने बँकेचे कामकाज बंद राहील. दिवाळीनंतर 28 ऑक्टोबरला गोवर्धन पुजा आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये बँका बंद असतील. तसेच, 29 ऑक्टोबरला भाऊबीज असल्याने बँकांचे काम बंद राहील.

Leave a Comment