जाणून घ्या नवीन ‘चेतक’बद्दलची ही माहिती

बजाजने आपली नवीन इलेक्ट्रिकल स्कूटर चेतकवरील पडदा हटवला आहे. जानेवारी 2020 मध्ये ही स्कूटर लाँच होणार असून, पुन्हा एकदा चेतक नव्या स्वरूपात भारतीय रस्त्यांवर धावताना दिसणार आहे. अर्बनाइट ब्रँड अंतर्गत बजाज नवीन थ्रि व्हिलर्स आणि छोटी इलेक्ट्रिकल वाहने देखील बाजारात आणणार आहे. चेतक ही बजाजची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

बजाज इलेक्ट्रिकल स्कूटर मेटल बॉडी निओ-रिट्रो डिझाईनमध्ये अधिक आकर्षक दिसत आहे. यामध्ये 12 इंचाचे एलॉय व्हिल्स देण्यात आले आहेत. याशिवाय एलईडी हेडलाईट्स, डेलाईट रनिंग लाईट यात मिळेल.

(Source)

याशिवाय या इलेक्ट्रिकल स्कूटरमध्ये आयपी 67 रेटेड हायटेक lithium-ion बॅटरीचा वापर केला आहे. ही बॅटरी 5-10 एएमपी इलेट्रिक्ल आउटलेटवर घरी देखील चार्ज करता येऊ शकते. चार्जिंग कंट्रोल करण्यासाठी यात इंटेलिजेंट बँटरी मॅनेजमेंट सिस्टम देखील मिळण्याची शक्यता आहे.

ही स्कूटर इको आणि स्पोर्ट्स असे दोन ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत. एकदा चार्ज केल्यावर ही स्कूटर इको मोडवर 100 किमी चालू शकते.

(Source)

जानेवारी 2020 मध्ये लाँच होणारी ही इलेक्ट्रिकल स्कूटर पहिल्या टप्प्यात पुणे आणि बंगळुरूमध्ये उपलब्ध असेल. या स्कूटरची किंमत 1.25 लाख ते 1.5 लाख रूपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या इतर इलेक्ट्रिक स्कूटरच्या तुलनेत बजाज चेतक नक्कीच हटके आहे.

 

Leave a Comment