पॉप्युलर कौन बनेगा करोडपतीमागे हा आहे मास्टर माईंड


सध्या सोनीवर कौन बनेगा करोडपतीचा ११ वा सिझन सुरु असून या शोची क्रेझ आजही कायम आहे. बिग बी उर्फ अमिताभचे कुशल संयोजन त्यासाठी खुपच महत्वाचे असले तरी कार्यक्रम लोकप्रिय होण्याचे सर्व श्रेय बिग बीचे नाही. या खेळाची कल्पना आणि तो यशस्वी करण्यामागे मोठे योगदान आहे ते या कार्यक्रमाचा मास्टरमाईंड अरुण शेषकुमार यांचे.

अरुण शेषकुमार यांनी त्याच्या करियरमध्ये अनेक यशस्वी हिट शो दिले आहेत. पण केबीसीमुळे मात्र यांनी अक्षरशः गगनाला गवसणी घातली आहे. या खेळाची गोष्टच वेगळी आहे. अरुण स्वतः मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले आहेत. त्यामुळे या वर्गाच्या गरजा त्यांच्या चांगल्या परिचयाच्या होत्या. त्यातूनच लोकांचे आयुष्य बदलेल असा खेळ देण्याची कल्पना त्यांना सुचली आणि त्यातून केबीसीचा चमत्कार घडला.

गेली १९ वर्षे या क्षेत्राशी संबंधित असूनही आजही केबीसीच्या सेटवर येताना अरुण नर्व्हस असतात. ते म्हणाले सेटवर आलो की १५ मिनिटात घामाघूम होतो. बिगबी विषयी त्यांच्या मनात खास जागा आहे. त्यांची कामाची तळमळ आणि प्रामाणिक प्रयत्न याचा मोठा प्रभाव अरुण यांच्यावर आहे. बिग बी केवळ या कार्यक्रमाचे होस्ट नाहीत तर तो तयार करण्यात त्यांचा पूर्ण सहभाग असतो असे अरुण सांगतात. तरीही सेट वर येताना अरुण आजही रोज नव्या कलावंताप्रमाणे प्रॅक्टीस केल्याशिवाय येत नाहीत. दुसरयासमोर खराब प्रदर्शन होऊ नये याचे टेन्शन त्यांना सतत असते. त्यांनी आजपर्यंत सत्यमेव जयते, सच का सामना, इंडियाज गॉट टॅलंट, नच बलिये, झलक दिखला जा असे अनेक लोकप्रिय कार्यक्रम दिले आहेत.

Leave a Comment