किम जोंग उनची माउंट पाईकेनो भेट, मोठ्या कारवाईचे संकेत?


उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने अमेरिकन नेतृत्वाने त्यांच्या देशावर घातलेल्या निर्बंधांविरुद्ध लढण्याचा संकल्प केला असून या निर्बंधांमुळे त्याच्या देशातील नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे मत व्यक्त केले आहे. बुधवारी किम जोंग उन याने पांढऱ्या घोड्यावरून कोरियातील सर्वात उंच आणि पवित्र शिखर मानल्या जाणाऱ्या माउंट पाईकेनो ला भेट दिली असून ही भेट म्हणजे मोठ्या कारवाईचे संकेत असल्याचे मानले जात आहे.

कोरियन न्यूज एजन्सीच्या बातमीनुसार गेली अनेक वर्षे उत्तर कोरियात सत्तेवर असलेल्या किम घराण्याची माउंट पाईकेनोवर श्रद्धा आहे. कोरियाच्या क्रांतिकारी इतिहासात या पवित्र शिखराचे दर्शन हे काही खास महत्वाच्या निर्णयाचे संकेत मानले जाते. किम परिवाराचे हे अध्यात्मिक स्थळ आहे. किम जोंग उन त्याच्या वाडवडिलांप्रमाणे महत्वाचा निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी येतो. सोल आणि वॉशिंग्टन बरोबर अण्वस्त्रसंदर्भात चर्चेच्या फेऱ्या सुरु होण्यापूर्वी सुद्धा किमने या शिखराला भेट दिली होती. बुधवारी किम जोंग सोबत त्याचे काही खास अधिकारी या पर्वत शिखरावर आले होते.

अमेरिकेने घातलेल्या निर्बंधामुळे कोरियन नागरिक दुःखी झाले आहेत आणि अमेरिकेवर त्याचा राग आहे. अण्वस्त्र चर्चेतून काहीच निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे भविष्यात जगाला जबर धक्का देणारी एखादी कारवाई करण्याचा संकल्प किम जोंग उन याने बोलून दाखविला आहे. त्यामुळे पांढऱ्या घोड्यावरून बर्फ पडत असतानाही किमने माउंट पाईकेतनोला दिलेली भेट कोणत्या मोठ्या कारवाईचा संकेत असेल याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Leave a Comment