ड्रीमगर्ल हेमामालिनी झाली ७१ वर्षाची


बॉलीवूडमध्ये ड्रीमगर्ल हे बिरूद खऱ्या अर्थाने सार्थ केलेली अभिनेत्री हेमामालिनी हिने १६ ऑक्टोबर रोजी वयाची ७१ वर्षे पूर्ण केली.१६ ऑक्टोबर १९४८ ही तिची जन्मतारीख. अभिनेत्री ते खासदार हा तिचा प्रवास लक्षणीय आहेच पण आजही सोज्वळ सौंदर्य म्हणजे हेमामालिनी हे तिला मिळालेले बिरूद कायम आहे. हेमामालिनीच्या खासगी जीवनाबद्दल फारशी चर्चा झालेली नाही. भाजपची मथुरेतील खासदार हेमामालिनी परम कृष्णभक्त आहे.

हेमामालिनीचे शालेय शिक्षण १० वी पर्यंतच झाले आहे. कारण चेन्नई येथे शाळेत शिकत असतानाचा तिला चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या आणि ११ वी मध्ये असतानाचा तिने सिनेमात काम करण्याची सुरवात केली. अभिनयाबरोबर शास्त्रीय नृत्याचे शिक्षण तिने घेतले असून आज या वयातही नृत्याचे कार्यक्रम ती करते. चित्रपट सृष्टीत तिचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते मात्र पडद्यावर तिची धर्मेंद्र बरोबरची जोडी विशेष गाजली होती. याच काळात ते एकमेकांच्या निकट आले. अनेकांना हे माहित नसेल की हेमा बरोबर लग्न करण्यासाठी धर्मेंद्रने नाव आणि धर्म बदलला होता.

हेमाने तिच्या पुस्तकात या संदर्भात लिहिले आहे. ती म्हणते पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घ्यावा लागू नये म्हणून धर्मेंद्रने स्वतःचे नाव दिलावरखान केवळ कृष्ण असे केले, त्यासाठी त्यांनी धर्म बदलला. हेमासोबत निकाह करताना झालेल्या निकाहनाम्यात दिलावर खान केवळ कृष्ण वय ४४, १,११,००० रुपये मेह सह आयेशा बी. आर चक्रवर्ती वय २९ हिचा दोन साथीदारांच्या साक्षीने पत्नी म्हणून स्वीकार करत असल्याचे नमूद केले गेले आहे.

Leave a Comment