अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांची पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी बाईक रायडिंग

आपल्या देशातील नेते महागड्या आणि मोठ –मोठ्या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी ओळखले जातात. मात्र एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 120 किलोमीटरचा प्रवास आपल्या आवडीच्या दुचाकीवरून केला आहे. अरूणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी अरूणाचल प्रदेशमधील यिंगकियोंग ते पासीघाट हा 120 किमीचा प्रवास रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650 या बाईकने केला. या प्रवासाचा व्हिडीओ देखील पेमा खांडू यांनी ट्विटरवर शेअर केला.

पेमा खांडू यांनी ट्विट केले की, पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न. बाईकिंग आणि एडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी सर्वोत्तम ठिकाण.

बाईक चालवण्याची पेमा खांडू यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील त्यांना रॉयल एनफिल्डची बाईक चालवताना पाहण्यात आले होते. याशिवाय मागील वर्षी अभिनेता सलमान खानबरोबर देखील त्यांनी सायकल चालवली होती.

रॉयल एनफील्ड इंटसेप्टर 650 मध्ये 650 सीसीचे पॅरलेल ट्विन इंजिन आहे, जे 270 डिग्री फायरिंग ऑर्डर सोबत येते. ते 47 बीएचपी पॉवर आणि 52 एनएम टॉर्क जनरेट करते.

Leave a Comment