दुबईतील परदेशी कैद्यांच्या घरवापसीसाठी या भारतीय उद्योगपतीने खरेदी केली तिकीट

दुबईमधील भारतीय उद्योगपती दुबईतील जेलमधून सुटका झालेल्या 13 परदेशी नागरिकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी तिकीट खरेदी केले आहे. यामध्ये पाकिस्तान, बांग्लादेश, चीन आणि अफगाणिस्तानमधील नागरिकांचा समावेश आहे.

पेहल इंटरनेशनल ट्रांसपोर्टचे अध्यक्ष आणि पेहल चॅरिटेबिल ट्रस्टचे (पीसीटी ह्यूमॅनिटी)  संस्थापक जोगिंदर सिंह सलारिया यांनी दुबई  पोलिसांच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून या कैद्यांना त्यांच्या स्वदेशी पाठवण्यासाठी तिकीट खरेदी केले.

सलारिया सांगितले की, या कैद्यांना अगदी छोट्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली होती. त्यांची शिक्षा पुर्ण झाली असून, आता त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे. या कैद्यांना त्यांचे स्वतःचे तिकीट खरेदी करणे शक्य नव्हते. दुबई पोलिस आमच्या संस्थेबरोबर मिळून अनेक चॅरिटीचे कामे करते. यावेळी या 13 कैद्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी तिकीट खरेदी केले. जेणेकरून ते आपल्या कुटुंबाला भेटू शकतील.

त्यांनी सांगितले की, दुबई पोलिसांनी आम्हाला कैद्यांची यादी दिली. यामधील अधिक कैद्यांवर जास्त वेळ दुबईत राहणे, भांडण असे गुन्हे होते. त्यांची मदत करणारे कोणीही नव्हते.

जोगिंदर सिंह सलारिया हे 1993 पासून दुबईमध्ये राहत आहेत.

 

Leave a Comment