या देशात नाही एकही एटीएम, प्रत्येक गोष्टीवर असते सरकारचे लक्ष

आफ्रिकेतील इरिट्रिया हा देश या आधुनिक काळात देखील पिछाडीवर आहे. या देशात एकही एटीएम नाही. येथे एका महिन्याला बँकेतून केवळ 23,500 रूपयेच काढण्याची परवानगी आहे. येथे सिमकार्ड खरेदी करणे देखील अवघड आहे. टिव्हीवर देखील सरकारला हवे असलेलेच चॅनेल्स दिसतात. सोशल मीडियाचा वापर करताना देखील लोकांना नियम लक्षात ठेवावे लागतात.

इरिट्रियाला 1993 मध्ये इथोपियापासून स्वातंत्र्य मिळाले होते. मात्र आजही येथे राष्ट्रपती इसायास अफेवर्की यांच्या पार्टीची सत्ता आहे. सरकारने दुसरा विरोधी पक्ष तयार करण्यास बंदी घातली आहे. मीडिया सरकार विरोधात काहीही लिहू शकत नाही. युवकांना सैनिकी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.

(Source)

1 टक्के लोकसंख्याच वापरते इंटरनेट –

इरिट्रियामध्ये एअरटेल एकमेव टेलीकॉम कंपनी आहे. जिच्यावर देखील सरकारचे नियंत्रण आहे. इरिट्रियामध्ये केवळ 1 टक्केच लोक इंटरनेटचा वापर करतात. येथे सिम कार्ड देखील स्थानिक प्रशासनाच्या परवानगीनेच मिळते. सिम मिळाल्यानंतर देखील त्यामध्ये डाटा नसल्याने इंटरनेटचा वापर करू शकत नाही. सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी देखील सरकारचे स्वतःचे नियम आहेत. दुसऱ्या देशातील नागरिकांना देखील सिमकार्डसाठी आधी अर्ज करावा लागतो.

(Source)

एक महिन्यात केवळ 23,500 रूपये काढू शकता –

बँकेत रक्कम जमा करण्याचे आणि काढण्याचे देखील नियम आहेत. एका महिन्यात केवळ 23,500 रूपये बँकेतून काढले जातात. लग्नासारख्या कार्यक्रमांवेळी अतिरिक्त पैसे काढू शकता. सरकार असे का करते, असे विचारल्यावर लोक सांगतात की, महागाई रोखण्यासाठी व नागरिकांना बचत करण्याची सवय लागावी यासाठी असे केले जाते. तर काही जणांचे म्हणणे आहे की, सरकारला व्यापारामधील देवाण घेवाण आवडत नाही.

राज्यात केवळ एक टेलिव्हिजन स्टेशन –

लोक टिव्हीवर काय बघणार हे देखील सरकारच ठरवते. संपुर्ण देशात एरी टिव्ही नावाचे एकच टिव्ही स्टेशन आहे. आंतरराष्ट्रीय चॅनेल बघण्यासाठी सॅटेलाईट डिश असणे आवश्यक आहे. मीडियावर देखील बंदी आहे. सूचना मंत्री येमेन मेस्केल यांचा दावा आहे की, 91 टक्के लोकांकडे डिश आहे व ते त्या 650 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय चॅनेल बघू शकतात.

(Source)

अनेक युवकांना सोडायचा आहे देश –

युवकांना सैनिकी प्रशिक्षण घेतल्यानंतरच पासपोर्ट दिला जातो. मात्र बाहेर जाण्यासाठी आवश्यक असलेला एग्झिट व्हिसा सरकार लगेच देत नाही. सरकारचे म्हणणे आहे की, जर युवक इतर देशात गेले तर परत येणारच नाहीत. त्यामुळे अनेक युवक बेकायदेशीर रित्या बॉर्डर पार करून सुदान किंवा इथोपिया येथे जाऊन राहतात. आतापर्यंत लाखो युवकांनी दुसऱ्या देशाचा रस्ता धरला आहे. कधीच जनगणना न झाल्याने सरकारकडे देखील देशाची जनसंख्या किती आहे याची आकडेवारी नाही. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्यूनुसार, या देशाची एकूण लोकसंख्या 35 लाख आहे.

(Source)

राजधानी अतिशय सुंदर –

देशाची राजनाधी असमारा ही अनेक गोष्टीत इटलीप्रमाणे आहे. 1930 मध्ये इटलीचे हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी असमाराला रोमप्रमाणे बनवणार होते. येथील इमारती या इटालिय आर्किटेक्चरप्रमाणे बनलेल्या आहेत.

Leave a Comment